tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post1432155425013851126..comments2023-08-13T12:23:40.679+05:30Comments on शोध आणि बोध: पुस्तक परीक्षण: दहशतवादाची रूपेMahaveer Sanglikarhttp://www.blogger.com/profile/15416335970312705944noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-32434564696617685462012-08-10T13:47:03.130+05:302012-08-10T13:47:03.130+05:30मी मूळ पुस्तक वाचलेले नाही हे आधीच स्पष्ट करतो. श्...मी मूळ पुस्तक वाचलेले नाही हे आधीच स्पष्ट करतो. श्री सोनवणी, श्री सांगलीकर यांचे जेवढे लेखन वाचलेले आहे त्यावरून मला त्यांची ओळख "दीड-पावणेदोनशे वर्षांपासून सुरू झालेल्या वैचारिक चळवळीचे समर्थक" अशी वाटते. "चळवळ" ही नेहेमी आपल्याला जे वाटते ते साध्य करण्यासाठी केली जाते, त्यामुळे त्यातील "विचार" हा साध्य नसून साधन असतो. ही चळवळ मुख्यत: भारतीय संस्कृती - हिंदू संस्कृती यातील सर्वसमावेशकता काढून घेऊन (सर्वांना परकेपणा वाटावा म्हणून त्याला "ब्राह्मणी संस्कृती" असे नाव दिले जाते) अलगता दाखवण्यावर भर देते. ही अलगता दाखवण्यासाठी प्रत्येक घटकात काहीतरी दुखरी बाजू निर्माण करणे - चुकीच्या रूढी, परंपरा सुधारण्यापेक्षा पूर्ण संस्कृतीलाच वाईट ठरवण्याचा प्रयोग - मुस्लीम आणि ख्रिश्चन यांच्याबद्दल सहानुभूती आणि आपापल्या वेगळ्या घटकाचे सामाजिक / राजकीय संघटन हा या चळवळीचा साचा आहे. एखाद्या चळवळीमागील सगळ्याच घटकांचे हेतू सारखेच असतील असे नाही. मला या चळवळीच्या सुरुवातीच्या दिवसांचा मागोवा घेताना असे दिसते की ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना यात नक्कीच रस होता. त्यांच्यासाठी त्याचे अनेक फायदे होते. समाज फुटला तर परकीय सत्ता टिकून राहू शकते - एकीकडे ख्रिस्ती धर्माचा प्रसार, ज्यातून सत्ता कायमस्वरूपी होऊ शकते. ब्रिटिशांखेरीज अन्य घटक म्हणजे समाज सुधारणेसाठी तळमळ असलेले लोक, जाती-जातींमधील अंतर्गत द्वेष-असूया, व्यक्तिगत अनुभवांतून उद्भवलेला अपेक्षाभंग - अपमान - संताप याचे सर्वसमावेशक द्वेषात रूपांतर, सर्वात अलीकडे पन्नास-साठ वर्षांत भ्रष्ट राजकारण्यांची निवडणुकीची गणिते - त्यांच्या बगलेत बसून फायदे मिळवणारे विचारवंत, मिडिया, बालपणापासून या विचारांचा मारा झाल्यामुळे तेच खरे मानणारा - त्या विचारांच्या देश-विघातक परिणामांकडे दुर्लक्ष करणारा वाट चुकलेला "विचारवंत", "सुशिक्षित" समाज - असे अनेक. हा विचार आज भारतात "प्रस्थापित" आहे. त्यामुळे सोनवणी यांनी इस्लाम च्या दहशतवादाला "प्रतिक्रिया" म्हणून पाहिले हे काही आश्चर्य नाही. कारण इस्लाम हे त्यांच्या चळवळीचे "लक्ष्य" नाही.Corporate Cell Punehttps://www.blogger.com/profile/02859563812592988208noreply@blogger.com