सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Sunday, July 29, 2012

पुस्तक परीक्षण: शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव

-महावीर सांगलीकर

डॉक्टर विनोद अनाव्रत या लेखकाचे ’शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. हे विनोद अनाव्रत तेच ज्यांनी या आधी ’शिवधर्म: हिन्दु धर्माशी फारकत की संगनमत’ हे पुस्तक लिहिले होते. आधीचे पुस्तक सरळ सरळ मराठा समाजाच्या विरोधात होते. हे नवे पुस्तक एकाच वेळी छ. शिवाजी महाराज, मराठा समाज आणि ब्राम्हण या सगळ्यांना टार्गेट करते. हे पुस्तक लिहून लेखकाने एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा उद्योग केला आहे.

’शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्या मागचे वास्तव हे या पुस्तकाचे शीर्षकच मुळात आक्षेपार्ह आहे. शीर्षकासकट संपूर्ण पुस्तकात लेखकाने छ. शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला आहे. तसा तो इतरही अनेक इतिहासलेखक करत असतात, पण या पुस्तकाच्या लेखकाचा असा एकेरी उल्लेख करण्यामागील उद्देश महाराजांच्याविषयी तुच्छ्ताभाव दाखवणे हाच आहे असे हे पुस्तक वाचल्यावर दिसून येते.

पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणाचे शीर्षक ’शिवाजीच्या महानतेचा बागुलबुवा’ असे आहे. या प्रकरणात ’शिवाजीचा फुगा कोणी व का फुगवला’ असे एक उपप्रकरण आहे. लेखकाच्या मते ब्राम्हणांनी शिवाजीचा फुगा फुगवला, व त्याची प्रेरणा त्यांनी महात्मा फुले यांच्याकडून घेतली. (पान २०). शिवाजी महान नव्हता असे लेखकाचे मत आहे.

या पुस्तकातील कांही प्रकरणाची शीर्षके आणि उपशीर्षके अतिशय आक्षेपार्ह आहेत. असेच एक उपशीर्षक म्हणजे 'हिंदू शब्दरूपी बाटलीत शिवाजी नामक दारू'. अशा आक्षेपार्ह शीर्षक-उपशीर्षाकांपेक्षा पुस्तकातील अनेक विधाने जास्तच आक्षेपार्ह आहेत. पुढील उदाहरणे पहा:

एवढा शूरवीर; तरी ब्राम्हणांचे पाय धुवून पाणि पिल्यागत वागणारा आज्ञाधारक राजा ब्राम्हणांनी यापूर्वी कधी पाहिला नव्हता (पान २६). शिवाजी खंडणी वसूल करत असे हे सांगताना लेखकाने म्हंटले आहे: जिथे खंडणी नाकारली जायची तेथे लूटमार करून ते खेडे नष्ट केले जायचे. मराठ्यांनी कुणब्यांची लूट करण्याचा तो परवाना छ. शिवाजीच्या धोरणाचा भाग होता. (पान ९१).

पुस्तकातील अनेक आक्षेपार्ह विधाने येथे देणे शक्य नाही कारण तसे करणे मला चुकीचे वाटते.

लेखकाने पुस्तकात औरंगजेबाची वारेमाप स्तुती केली आहे व औरंगजेब हा शिवाजी महाराजांपेक्षा कसा श्रेष्ठ होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी तब्बल ६० पानांचे ’रयतेचा खरा राजा कोण: शिवाजी की औरंगजेब’ हे प्रकरण लिहिले आहे. लेखकाने औरंगजेबाने आपल्या बापाला व भावाला मारले यात काय विषेश असे म्हणत प्राचीन काळी अजातशत्रू या राजाने आपल्या वडिलांना मारले होते याचे उदाहरण दिले आहे. पण लेखकाची चलाखी पहा, त्याने अशोकाने आपल्या अनेक भावांना ठार केले होते याचा उल्लेख मात्र सोयीस्कर पणे टाळला आहे. वास्तविक अजातशत्रू हा फारसा कुणाला माहित नाही, अशोक मात्र बहुतेकांना माहीत आहे, तेंव्हा त्याचे उदाहरण देणे जास्त योग्य ठरले असते. पण अशोक हा बौद्ध असल्याने या नवबौद्ध लेखकाने अशोकाचे उदाहरण देण्याचे टाळले आहे हे सरळ दिसते.

लेखकाने लिहिता-लिहिता या पुस्तकात मराठ्यांना छ. शाहू महाराज व औरंगजेब हे शिवाजी महाराजांपेक्षा श्रेष्ठ होते हे मान्य करावे असा अनाहूत सल्ला दिला आहे.

हे पुस्तक पुण्याच्या सुगावा प्रकाशनने प्रकाशित केली आहे. लेखक व प्रकाशक दोघेही कट्टर मराठा विरोधक आणि त्यामुळे मराठ्यांशी संबंधित शिवधर्म वगैरेंचे विरोधक आहेत. असे पुस्तक लिहिण्यामागे व प्रकाशित करण्यामागे या दोघांचा हेतू मराठाद्वेषाची आपली हौस भागवून घेणे हाच दिसतो. पण हे दोघेजण ही गोष्ट विसरतात की शिवाजी महाराज कांही केवळ मराठ्यांचे नव्हते आणि नाहीत.

मला आश्चर्य या गोष्टीचे वाटते की हे पुस्तक प्रकाशित होवून एक वर्ष उलटून गेले, पण छ. शिवाजी महाराजांचा उपयोग आपल्या मुस्लिम विरोधी किंवा ब्राम्हण विरोधी राजकारणासाठी करणारे तथाकथित शिवप्रेमी समूह अजूनपर्यंत मूग गिळून गप्प बसले आहेत. कुठे चर्चा नाही, विरोधाचा सूर नाही, पुस्तकाचे खंडण नाही. अशा प्रकारचे पुस्तक एखाद्या ब्राम्हण लेखकाने लिहिले असते तर ब्राम्हणविरोधी तथाकथित शिवप्रेमींनी काय केले असते याची कल्पनाच करवत नाही. यावरून सरळ दिसते की त्यांचे शिवप्रेम बेगडी आणि सोयीस्कर आहे.


शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव
लेखक: डॉक्टर विनोद अनाव्रत
पाने १८०, किंमत १८० रुपये
प्रकाशक:
सुगावा प्रकाशन
५६२ सदाशिव पेठ
पुणे ४११ ०३०
फोन: ०२० २४४७ ८२६३


हेही वाचा: 
 पुस्तक परीक्षण: दहशतवादाची रूपे
बौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता 
बौद्ध धर्मातील ब्राम्हण

10 comments:

Anonymous said...

aadarniya sir,mi he pustak vachale aahe.mulamadhye ya pustkatil prkare hi atyat chukichya padhatine mandanyat aaleli aahet.aani tyasathi yogyatya itihasik sadhanacha upyog karnyat aalela nahi.
aani tyatil bhashe vrun lekhakachi layaki kalun yet aahe.tyamule aamhi yala jast mhtav deu ichhit nahi.

Anonymous said...

asha batgyanna jast mahatva na dilelach bara!!

dasharath yadav said...

adani alpa dyani loahi nava nahi nagave nachun lakhsy avedhnycha pryatn..dusare kay

Dr Prashant N Mohite said...

I congratulate and thank Mr Mahavir Sanglikar for bringing forth such an issue. Basic problem lies in the fact, that so called Navbauddha are still not ready to understand that they can not fight this Jativyavastha and Brahmin superiority alone, without help of other factions of Bahujan Samaj, mainly Maratha samaj. Some people like Vinod Anavrat tries to become famous by publishing something hidious against Maratha Daivat like Shivaji Maharaj. They think they are targetting Maratha samaj by blaming Shivaji Maharaj. However they completely fail to understand that the real enemy are not Marathas.
Apart from that nasty joke in the book, James Laine has rather praised Shivaji Maharaj and has given rather truthful picture of Maharaj's rule. Vinod Anavrat has tried to target Shivaji Maharaj, compared him with Aurangjeb and has given fancy and catching titles in his book. His agenda of becoming famous in his people does not remain hidden.
Regarding Shivpremi organizations, I would say, it is a good move by them, not paying heed and attention to this rubbish as they understand perfectly who is the real enemy.
Dr. Prashant N Mohite

. said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

"मला आश्चर्य या गोष्टीचे वाटते की हे पुस्तक प्रकाशित होवून एक वर्ष उलटून गेले, पण छ. शिवाजी महाराजांचा उपयोग आपल्या मुस्लिम विरोधी किंवा ब्राम्हण विरोधी राजकारणासाठी करणारे तथाकथित शिवप्रेमी समूह अजूनपर्यंत मूग गिळून गप्प बसले आहेत. कुठे चर्चा नाही, विरोधाचा सूर नाही, पुस्तकाचे खंडण नाही. अशा प्रकारचे पुस्तक एखाद्या ब्राम्हण लेखकाने लिहिले असते तर ब्राम्हणविरोधी तथाकथित शिवप्रेमींनी काय केले असते याची कल्पनाच करवत नाही. यावरून सरळ दिसते की त्यांचे शिवप्रेम बेगडी आणि सोयीस्कर आहे."

he faar barobar lihilet sangavikar. He pustak ekhadya brahman manasane kinva musalmanane lihile asate na tar he Brigedi lok chavatalun uthale asate.. hya lokan kade apan laksha deu naye asa comments madhe lihanaryanni mag James Lane chya veles asa vichar ka nahi kela.. Dutappi ani begadi lok ahet he sagale.

Anonymous said...

dr anavrat ( kasle hi vrat na ghetlele sad grahastha asnar he ) sahebani jo kahi prapanch mandla ahe tyache vishye far kahi ata lihit nahi pustak vachle ki mag tyana pratyaksh bhetun tyanche mat vichar samjun gheu amhi . baki tyana tyanche maat mandaycha kaydeshir adhikar ahe ghatnene dilela to tyani asa kayam bajawawach

Vighnhaari vighnharta said...

नमस्कार सांगलीकर साहेब,
मी आपला लेख माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केला आहे. परंतु आपल्याला न विचारता प्रसिद्ध केल्याबद्दल माफी मागतो. परंतु आपल्याशी संपर्क करण्याची सोय नसल्याने आपल्याला विचारता आले नाही (माझ्या फेसबुकवरील फ्रेंड रिक्वेस्ट आपण रिजेक्ट केलीत आणि माझ्या कॉमेंट्स सुद्धा काही दिवसाकरिता बंद आहेत). त्यामुळे आपल्याला संपर्क न करता व परवानगी न घेता आपले लेखन माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केल्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व.
आपले नाव लेखात प्रसिद्ध केले आहे आणि आपल्या लेखाची लिंक सुद्धा दिलेली आहे.
समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.

माझ्या ब्लॉगवरील आपला लेख - http://vighnharta.blogspot.in/2013/03/blog-post_356.html

पुन्हा एकदा क्षमस्व.

Vighnhaari vighnharta said...

नमस्कार सांगलीकर साहेब,
मी आपला लेख माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केला आहे. परंतु आपल्याला न विचारता प्रसिद्ध केल्याबद्दल माफी मागतो. परंतु आपल्याशी संपर्क करण्याची सोय नसल्याने आपल्याला विचारता आले नाही (माझ्या फेसबुकवरील फ्रेंड रिक्वेस्ट आपण रिजेक्ट केलीत आणि माझ्या कॉमेंट्स सुद्धा काही दिवसाकरिता बंद आहेत). त्यामुळे आपल्याला संपर्क न करता व परवानगी न घेता आपले लेखन माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केल्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व.
आपले नाव लेखात प्रसिद्ध केले आहे आणि आपल्या लेखाची लिंक सुद्धा दिलेली आहे.
समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.

माझ्या ब्लॉगवरील आपला लेख - http://vighnharta.blogspot.in/2013/03/blog-post_356.html

पुन्हा एकदा क्षमस्व.

ajay jadhav said...

he khare tar khup dhakkadayak aahe... James Lane ha pardeshi hota he many, matr eka maharashtrian mansane Chh. Shivaji maharajan babat asa chukicha samaj samajat pustak rupane pasrava he vachun khed watala...
anek lekhkanni Chh. Shivaji Maharajan babat likhan kele aahe, anek itihaas sanshodhak manasanni dekhil khup kasht karun barich mahita ujedat aanli aahe.. tyancha sandarbh na gheta he asale FODAFODICHE prakaran karane prastut lekhkala shobha denare nahi.. shivay yamule don samajat jatiy ted nirman hoyil ti weglich...
asha likhanamule samajatil jatiy salokha bhang n zalyas nawal..!

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे