सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Sunday, June 24, 2012

बौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता

-महावीर सांगलीकर

भारतातील जातीवाद आणि अस्पृश्यता याबद्दल हिंदू धर्माला जबाबदार धरण्यात येते. ब्राम्हणांनी जाती तयार केल्या कांही जातींना अस्पृश्य ठरवले असा ब्राम्हण विरोधकांचा एक लाडका सिद्धांत आहे. पण प्रत्यक्षात जाती बनण्याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत. अगदी सिंधू संस्कृतीत सुद्धा जाती आणि उच्चनीचता होती. फार तर असे म्हणता येईल की समाजातील या जातीवादाचा ब्राम्हणांनी आपल्या स्वार्थासाठी फायदा करून घेतला.

अस्पृश्यता हा मानवतेला लागलेला एक कलंक आहे असे महात्मा गांधी म्हणायचे. अस्पृश्यता ही ब्राम्हणांची देणगी आहे असे सर्वसाधारण मत आहे. ते खरे असेल नसेल, पण बौद्ध धर्मात जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता होती आणि आजही आहे हे वाचल्यावर वाचकांना आश्चर्याचा धक्का बसेल. पण हातच्या काकणाला आरसा कशाला? चला आपण वेगवेगळ्या बौद्ध देशांमध्ये बौद्ध लोक कशी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता पाळतात ते पाहुया.

भारतातील लडाख भागात 'ओरिजिनल' बौद्ध धर्म आणि त्याचे अनुयायी आहेत. त्यांच्यात जातीव्यवस्था तर आहेच पण हे बौद्ध धर्मीय लोक अस्पृश्यतेचे पालनही करतात. विशेष म्हणजे यांच्यातील अस्पृश्य जाती या वेगळ्याच आहेत. त्यात लोहार वादक या दोन जाती मुख्य आहेत. भारताच्या इतर भागात पूर्वी अस्पृश्यांना जी वागणूक दिली जायची तशी वागणूक या बौद्धबहुल भागात तेथील विशिष्ट जातींना आजही दिली जाते.

लडाखमधील बौद्ध समाज जशी अस्पृश्यता पाळतो अगदी तशीच अस्पृश्यता नेपाळ मधील बौद्ध समाज पाळतो. भारताचा पिटुकला शेजारी भूतान हाही एक बौद्ध देश आहे. यथील बौद्ध समाजात जाती आणि अस्पृश्यता या दोन्ही गोष्टी आहेत.

तिबेट हा बौद्ध धर्माचा बालेकिल्ला मानला जातो. या देशात राग्यापा नावाची अस्पृश्य जमात आहे. त्यांना हीन वागणूक दिली जाते. इतकेच नाही तर तिबेटन बौद्ध धर्मियांचे नेते दलाई लामा यांनी दोन दशकांपूर्वी बौद्धांच्याच एका पंथाला बौद्ध समाजातून बहिष्कृत करून अस्पृश्य ठरवले. त्यांना दवाखान्यात, दुकानांमध्ये, हॉटेल मध्ये आणि मठांमध्ये प्रवेश करायला बंदी घातली.

चला आता आपण जपानला जाऊया. या देशात बुराकुमीन नावाचे अस्पृश्य लोक आहेत. त्यांची संख्या साठ लाखाहून जास्त आहे. याना जपान मधील बौद्ध आणि शिंतो या दोन्ही धर्माचे लोक अस्पृश्य मानतात. पूर्वी यांचा कोणाला स्पर्श झाला तर त्याला बौद्ध साधूकडून शुद्ध होण्यासाठी विधी करून घ्यावी लागत असे. जपानमध्ये पूर्वी अस्पृश्यता नव्हती, पण भारतातून आलेल्या बौद्ध धर्माबरोबर ती तेथे आली असे मानले जाते.

श्रीलंका हा देश बौद्धबहुल आहे. येथील सिंहली लोक हे बौद्ध धर्मीय आहेत. त्यांच्यात जातीव्यवस्था आहे, तसेच अस्पृश्यताही आहे. सिंहली समाजातील रोडी ही जात सर्वात मोठी अस्पृश्य जात आहेत. याशिवाय येथे किन्नराया नावाची एक अस्पृश्य जात आहे. भारताप्रमाणेच येथेही अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांची वस्ती गावाबाहेर असते.

बर्मा किंवा म्यानमार हाही एक बौद्ध बहुल देश आहे. हा जगातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक देश आहे. या देशातही जातीच जाती आहेत, तसेच अस्पृश्यताही आहे. पूर्वी येथील अस्पृश्य जातींचा प्रचंड अभ्यास महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही तेथील अस्पृश जातींचा अभ्यास करण्यासाठी या देशाला दोन वेळा भेट दिली होती. पाराग्यून ही येथील सर्वात मोठी अस्पृश जमात आहे. त्याशिवाय रोहिंग्या ही दुसरी मोठी अस्पृश्य जमात आहे. या देशातील अस्पृश्य लोक मानवाधिकारांपासून देखील वंचित आहेत.

याशिवाय कंबोडिया, विएतनाम, चीन, कोरिया, थायलंड, तैवान, मंगोलिया, होंग कोंग, लाओस हे सगळे देश, जेथे बौद्ध धर्मीयांची संख्या ७५% ते ९५% आहे, तेथे बौद्ध धर्मीयांनी त्यांच्यातीलच कांही जातींना बहिष्कृत करून त्याना अस्पृश्य ठरवले आहे.

आपल्या येथील अनेक लोक मानतात की बौद्ध धर्मात जातीव्यवस्था अस्पृश्यता नाही. प्रत्यक्षात बौद्ध धर्मात या दोन्ही गोष्टी आहेत हे वरील माहितीवरून दिसून येते. कांही अरब देशांमध्ये, युरोपिअन देशांमध्ये देखील कांही जमातींना अस्पृश्य मानले जाते. त्यामुळे जातीव्यवस्था अस्पृश्यता यांचे खापर ब्राम्हणांवर फोडणे चुकीचे आहे. खरी गोष्ट ही आहे की जातीव्यवस्था अस्पृश्यता निर्माण होण्याची खरी कारणे काय आहेत याची आपण चर्चा करत नाही.

भारतातून अस्पृश्यता -यापैकी नष्ट झाली, पण बौद्ध देशांमध्ये ती आजही आहे याला काय म्हणावे?

ज्यांना मी दिलेल्या माहितीविषयी शंका वाटते, त्यांनी गुगल सर्च करावे.

जातीव्यवस्था अस्पृश्यता कशी निर्माण झाली? याची माहिती देणारा माझा लेख नंतर प्रकाशित होईलच.

14 comments:

. said...

dalai lama ne bahishkar taklela panth ha hinsak ritine swatantrya magat hota ani te etar hinsak saduna apale adarsh mhanat hote.Japan madhey buddha dharma purn rupat gela nahi.etarahi local pratha mix zalya.

Buddha mhanatat jya prakare nadya nalya samudrat vilin zalyavar tyanchatala bhed mitato,pani eksanth hote farak olakhu yet nahi tyachprakare dhammat vilin zalyavar upasankat farak rahat nahi te ekjiv hotat.

theravada buddhism ani ,gelapus/mahayana yant ha farak ahe ki mahayana madhe anek rituals samil zale.theravada madhe ase prakar kami sapdtil.

Satyashodhak kamgar sanghatana said...

महावीर सांगवीकर यांना काय शिध करायचे आहे? बुद्ध धम्मातील फरक कि हिंदू धर्माचे समर्थन?. एकाच धर्माचे लोक जेव्हा एकत्र राहतात तेव्हा त्यातून वर्ग निर्माण होतात त्यातून थोड्या थोड्या घटना घडून जातात तून विषमता निर्माण होते.तेच पुढे रिवाज बनतात मग धर्मा पेक्षा प्रतिष्टा मोठी होते.त्यातून जातीवाद आणि अस्पुश्यता या बद्दल प्रत्येक देशात वेगळ्या वेगळ्या प्रथा असतील त्याला मूळ बौद्ध धम्म जबाबदार कशा असेल प्रथम बुद्ध धम्म की धर्म हे लक्ष्यात घ्या

shrawan deore said...

We are waiting for your further article.

shrawan deore said...

In Hindu purana Parshuram (Brahmin) annihilated Kshatriyas 21 times. In Jain history it is narrated that Kshatriyas annihilated Brahmins 21 times. Is it true? May I have any reference?

mypledge said...

बोद्ध धर्मातील जातीय वेवस्था वाचून धक्का बसला. या देशातील वंचित समाजाला सांस्कृतिक परिवर्तनाचा एकमेव मार्ग वाटणारा बोद्ध धर्म अनुयायी अस्पृशता पळणार असतील तर फार वाईट गोष्ट आहे. जातीयता आणि विषमतेने बरबटलेल्या देशात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय समता प्रस्थापित करण्यासाठी बोद्ध तत्वज्ञान फलदायी ठरेल असे वाटत नाही.

Raj Jadhav said...

Mahaveer Sanglikaranche Mhanane eka veles barobar ahe... Dr. Babasaheb Ambedkarani "Bauddha and His Dhamma" madhe Mahayan ani Hinyan kashe nirman zale yache thodyat sangitale ahe... Samrat ashokachya Nantar... thodafar Boudha Dhammacha Rajashray Sampushtat ala hota...tyach pramane Greek lokani jevha Akraman kelyanant... Bukkhinshi vad vivad karun Greek Raja Milind Boudh Zala..va Buddha Dhammas Rajashray milala...paruntu Bahurun alelya Greek Raja... Hindu Dharmin sathi dekhil ujava hota ...tyamule....vadik sanskritine punha punha apale doke var kadahle ... Tasech Muslim Rajyakartanchya kalat dekhil mothya pramanat Boudha Bhikkunchi hatya karnyat ali....tyamule Mul Boudha Dhamma cha rhas hor gela...tyamule... Mul Buddha Dhamma Madhe... Brahmin ani Vaidik Sanskritine doke ghalun...Mul Budhamm kalushit karun... tyacha rhas karnyacha praytna kela...tymule Baher gelela Buddha Dhamm ha Mulacha nasun to milawat ahe...parantu Dr. Babasaheb Ambedkarani Tathagat Goutam Buddhacha Mul Boudha Dhamma Swikarla ahe...parantu Mul Buddha Dhmaacha Prasar ani Prachar karnyasathi Babasahebana vel milala nahi ani... tyanche Mahaparinirvan Zale... Parnatu aplya Samajala Buddha Dhamma Kalava mhanun..tyani "BUDDHA AND HIS DHAMMA" he pusatk lihale... Krupa karun lokani...dusara kay mhantoy tya kade laksh na deta.... swata ya pustkache vachan karave ani khara buddha dhamma kay sangato...te pahave... Dhanyawad

Unknown said...

महावीर सांगलीकर एकवेळ जरुर तुमची भेट घेईल...

बरं आता जो काही तुम्ही अभ्यास केला आहे तो स्तुतीपात्र आहे यात शंकाच नाही...

जगाच्या पाठीवर असे किती धर्म आहेत ज्यांचे संस्थापकांनी प्रस्थापित केलेला धर्म, मांडलेले विचार, व्यवहार पद्धत, इत्यादी गोष्टी मुळ स्वरुपात किती राहिल्या आहेत?
दुसरं म्हणजे, इतर हयात धर्मात असे किती धर्म आहेत त्यांचे संस्थापक आहेत?
मुळ बौद्ध धम्मात जातीव्यवस्था व अस्पृशता असे काही आहे का? असेल तर जरुर सांगा....

जगाच्या पाठीवर माझ्या माहीतीनुसार कोणताच मुळ धर्म जातीव्यवस्था व अस्पृशता मान्यता देत नाही दिली गेली तर त्यांच्या कु-कर्मावर लादली जाते त्याचा परिणाम म्हणुन त्यांचे वंशजांना सुद्धा काही काळ [मी पुन्हा सांगतोय "काही काळापुरते" असते] भोगावे लागते हा तर निसर्ग नियम आहे...


परंतु हिदु धर्मात मान्य असल्यामुळे जन्मापासुन काही वेळा धर्माविरोधी केलेल्या कृत्यामुळे "जातीव्यवस्था व अस्पृशता" कायम पिढीजात राहते....!!!!

NITIN DIVEKAR said...

आयु.महाविर सांगलीकर,

महात्मा गान्धींवर लिहिला गेलेल्या तुमच्या लेखावर जबरदस्त टिका झाल्यमुळे तुम्ही निराश आहात कदाचित आंबेडकरवाद्यांवर भडकलेले आहात व त्याच निराशेतुन तुम्ही बौद्धधम्मावर टिका करणारा हा लेख लिहिला आहे हे उघड. पण हा लेख लिहिताना तुम्ही एक मुलभुत गोष्ट विसरला आहात किंवा तुम्ही एक मुलभुत गोष्ट जाणिवपुर्वक दुर्लक्षित केली आहे आणि ती गोष्ट म्हणजे बौद्ध धम्म जातीव्यवस्थेचे समर्थन करित नाही. जरी जगभरातील बौद्ध समाजात काहि भेद असले तरी बौद्ध धम्म मात्र जातीव्यवस्थेचे समर्थन करत नाही. आज जैन धर्मात देखिल जातीभेद अस्तित्वात आहे हे तुम्हाला माहित आहे. तेव्हा बौद्ध धम्मावर टिका जरुर करा आणि त्याच बरोबर तुम्ही ज्या जैन धर्माच किंवा पंथाचे आचरण करता त्याचे देखिल विश्लेषण करा हि सुचना.........

Yashwant Vasagadekar said...

Mahavirji, thanks for sharing the
info, will help people understand
reality.

thanks,
Yashwant V. Nasik.

Jayesh said...

Very Very Nice Article. I am waiting for your Next article.

Dr. R.J. Tayade said...

I am not able to understand what author would like to tell the people. from this article I understood that he particularly want to focus the untouchability in Buddhisum. I dont know the reason behind this but I just want to ask one question that would author like to see the India without untouchability? Does he has dare to do this? can he educate the people for this noble cause. It may help for India's progress. He must understand that when rain comes it gives us clear water but when it fall on earth many thing come together and flow like river. It does not mean rain brings everything with him. See the situation of river ganga, which origin is considered from Shiva's Jata, but see the present situatation, government want to clean it....

Abhimanyu Pawar said...

खरच वाचुन धक्का बसला. आपण जैन धर्म संदर्भात हि सविस्तर माहिती दयावी.

Dev bhivsane said...

लेखक बौध्द धर्माबद्दल किंवा धर्मीयांबद्दल पुर्वाग्रह सुडबुध्दीने लेखन करीत आहे हे इथे प्रकर्षाने जाणवताना दिसते. लेखक हिंदू धर्माबद्दल विचार मांडत आहेत की बौध्द धम्माबद्दल कळायला मार्ग नाही. ज्याप्रमाणे हिंदू धर्मात जाती व वर्णव्यवस्थेला धार्मीक ग्रंथांचा आधार देण्यात आला आहे तसे बौध्द धम्मामध्ये कुठे जाती वर्णाला समर्थन किंवा ग्रंथरुपाने आधार दिलेला आहे का? असेल तर तेही लेखकांनी सविस्तर बौध्द ग्रंथाच्या आधारांवर लिहावे म्हणजे दुध का दुध पाणि का पाणि होऊन वस्तूस्थिती कळून येण्यास मदत होईल. धर्मातील लोक कसे वागतात याला महत्व नसते तर धर्म ग्रंथात काय सांगीतले आहे यावर त्या धर्माचे खरे श्रेष्ठत्व, कणिष्ठत्व ठरत असते. जर समाज मनवी समतेच्या धार्मिक ग्रंथानूसार आचरन सोडून विषमतेचे आचरन करीत असेल तर त्याला धर्म जबाबदार नाही. त्याला तेथील समाज जबाबदार आहे. बौध्द ग्रंथ हे समानतेचे पाईक आहेत. बौध्द धम्माचा जन्मच वैदीकांच्या व तत्सम विचारधारेच्या विषमतेच्या विरोधात झाला आहे. जगातील सर्वच धर्मामध्ये सामाजिक परिस्थितीनूसार कमी अधिक प्रमाणात उचनिचता आहे पण हिंदू धर्माप्रमाणे त्याला बंदीस्त स्वरुपात ग्रंथरुपाने समर्थनीय आधार दिलेला नाही. हे समजून घेतले पाहीजे.

Akash Tayade said...

We are waiting for your further article.

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे