सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

सुपार्श्वनाथ कोण होते?

-महावीर सांगलीकर 

जैन धर्मात एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. त्यातले ऋषभनाथ, ज्यांना आदिनाथ या नावानेही ओळखले जाते, हे पहिले तर महावीर हे शेवटचे म्हणजे 24वे तीर्थंकर होते. या सर्वांनी त्यांच्या-त्यांच्या काळात जनतेला उपदेश करून सन्मार्ग दाखवला.

तीर्थंकरांच्या या मालिकेतले 7 वे तीर्थंकर म्हणजे सुपार्श्वनाथ होत. त्यांचा जन्म वाराणसी इथे झाला होता. त्यांचे वडील इक्ष्वाकू कुळातील राजे प्रतिष्ठ आणि राणी पृथिवी यांच्या पोटी झाला होता. इक्ष्वाकू कुळाची सुरवात पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांच्यापासून झाली. 24 तीर्थंकरांपैकी 22 तीर्थंकर हे इक्ष्वाकू कुळातील होते.
पहिले तीर्थंकर ऋषभ नाथ यांना  नमी आणि विनमी असे दोन नातू होते. विनमीला मातंग नावाचा मुलगा होता. त्याच्यापासून मातंग वंशाची सुरवात झाली. पुढे मातंग वंशाच्या सात शाखा झाल्या. त्यातील एक शाखा म्हणजे नागवंश. या इक्ष्वाकूकुलीन मातंग वंशाची शाखा असणाऱ्या नागवंशातच तीर्थंकर सुपार्श्वनाथ होऊन गेले.

जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभनाथ. त्यांच्यापासून इक्ष्वाकू कुळाची सुरवात
                |
विनमी (ऋषभनाथांचा नातू)
               |
विनमीचा मुलगा मातंग (मातंग वंशाची सुरवात)
               |
मातंग वंशाची एक शाखा नाग वंश
               |
नागवंशात तीर्थंकर सुपार्श्वनाथ

जैन परंपरेत सर्व चोवीस तीर्थंकरांना वेगवेगळी चिन्हे आहेत. सुपार्श्वनाथांचे चिन्ह स्वस्तिक हे आहे, पण त्याचबरोबर  त्यांचे दुसरे चिन्ह फणाधारी साप  हे आहे. यातील स्वस्तिक हे चिन्ह सिंधू संस्कृतीशी संबंधित आहे, तर फणाधारी साप हे चिन्ह नागवंशाशी संबंधीत आहे. सिंधू संस्कृतीमध्ये मिळालेल्या कांही सील्स वरून सुपार्श्वनाथ सिंधू संस्कृतीशी संबंधीत असावेत असे दिसते.

भारतभरात सुपार्श्वनाथ ही मुख्य देवता असणारी अनेक जैन मंदिरे आहेत. ती अगदी गुजरातपासून झारखंडपर्यंत आणि आणि उत्तर प्रदेश पासून तामिळनाडूपर्यंत विखुरलेली आहेत. जगप्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे सुपार्श्वनाथ यांची बसदी (मंदिर) आहे.   तसेच राणकपूर (राजस्थान) या जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्रावरही  सुपार्श्वनाथ यांचे मंदिर आहे.

उत्खनन करताना ज्या जैन मूर्त्या सापडतात, त्यात बऱ्याचदा सुपार्श्वनाथांची मूर्तीही सापडते. कांही वर्षांपूर्वी सांगलीजवळील एका खेडेगावात सुपार्श्वनाथांची मध्ययुगीन मूर्ती सापडली होती.

विशेष म्हणजे सुपार्श्वनाथ यांचा यक्षही मातंग आहे.  सुपार्श्वनाथ यांचा यक्ष असणाऱ्या मातंगाची माहिती आपण पुढील भागात घेऊ.

हेही वाचा:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे