सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Tuesday, December 19, 2017

प्रबोधन: फटाके उडवू नका!


-महावीर सांगलीकर 

आपल्या इथे आनंदाच्या प्रसंगी फटाके उडवण्याची प्रथा आहे. जेव्हढा जास्त आनंद तेवढा जास्त आवाज करणारे फटाके! दिवाळीसारखे सण, लग्न, वाढदिवस, निवडणूक जिंकणे या प्रसंगी मोठ्या प्रमाणत फटाके उडवले जातात. पण फटाके उडवणे हा आनंद व्यक्त करण्याचा चांगला मार्ग नव्हे. फटाके उडवल्यामुळे जी हानी होते ते पाहिले की फटाके उडवणे ही संस्कृती नसून विकृती आहे हे दिसून येईल.

फटाक्यांमुळे होणारी हानी:
ध्वनी प्रदूषण: कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांचा त्रास वयस्क व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, बालके, रोगी, पशू-पक्षी या सर्वांना होतो. फटाक्यांच्या आवाजामुळे गर्भपात, कान बधीर होणे अशा घटना मोठ्या प्रमाणावर होत असतात.
नुकसान: फटाक्यांच्यामुळे दरवर्षी आगी लागून मालमत्तेचे प्रचंड नुकसान होत असते.
हिंसा: फटाक्यांच्यामुळे आग लागल्यामुळे दरवर्षी अनेकजण जीव गमावतात, जखमी होतात. शिवाय कित्येक ठिकाणी फटाके उडवणे भांडणास कारणीभूत होते.

जैन परंपरेत फटके उडवू नयेत असे सांगितले जाते. यामागे वरील कारणे तर आहेतच, पण आणखी एक महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे जैन परंपरा आनंदाचे, दु:खाचे आणि इतर भावनांचे अतिरेकी प्रदर्शन करण्यास मनाई करते. (आजकाल फटाके वाजवू नयेत ही चळवळ जोर धरत आहे, पण या चळवळीची सुरवात 30 वर्षांपूर्वी जैन मुनींनी सुरु केली, हे तुम्हाला माहित असायला हवे).

भावनांचे अतिरेकी प्रदर्शन करणारे लोक हे मानसिक दृष्ट्या मागासलेले असतात. त्यांचे आपल्या भावनांवर नियंत्रण नसते. पूर्वी जवळचे कोणी मेले की जोरदार आणि जाहीर रडारड होई. हे दु:खाचे अतिरेकी प्रदर्शन आणि भावनांवर नियंत्रण नसण्याचाच प्रकार होता. आरडाओरडा, धांगडधिंगा, मोठा आवाज करणे या गोष्टी भावनाचे अत्रेकी प्रदर्शनच आहे. खरं म्हणजे भावनांचे अतिरेकी प्रदर्शन प्रदर्शन हे मानवाच्या आदिम प्रवृत्तीचे लक्षण आहे. आदिम प्रवृत्ती ही आदिमानवाला शोभून दिसते, उत्क्रांत झालेल्या मानवाला ही प्रवृत्ती विकृत बनवू शकते. ही विकृती आपणास धार्मिक कार्यक्रमात, सण-उत्सवात दिसून येते. गणपती उत्सव हे त्याचे एक उदाहरण आहे. गणपतीपुढे नाच-गाणी, ध्वनी प्रदूषण, फटके वाजवणे हे कशाचे लक्षण आहे?   

तुम्ही जेंव्हा फटाके उडवण्याचे बंद कराल, ध्वनी-प्रदूषण करण्यापासून लांब रहाल तेंव्हा प्रगल्भ जीवनाच्या दिशेने एक पाउल पुढे टाकलेले असेल!   

हेही वाचा:

No comments:

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे