सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Sunday, June 24, 2012

वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?

-महावीर सांगलीकर

सध्या कांही लोकांकडून वारकरी संप्रदाय आणि बौद्ध धर्म यांचा ओढून ताणून संबंध जोडण्याचा प्रकार चालू आहे. विठ्ठलाला बुद्ध ठरवणे, संत तुकारामांवर बौद्ध धर्माचा कसा प्रभाव होता हे दाखवण्याचा खटाटोप करणे इत्यादी गोष्टी होत आहेत. यामागे सत्यशोधन नसून कांही राजकीय, सामाजिक व आर्थिकही गणिते आहेत. (आर्थिक गणिते विशेषत: लेखक-प्रकाशक यांना लागू पडतात). असो.

आज वारकरी संप्रदाय प्रामुख्याने मराठा, कुणबी, माळी, अलुतेदार-बलुतेदार जाती यांच्यात दिसतो. या सगळ्या समाजात तेराव्या शतकापर्यंत आणि त्यानंतरही जैन धर्माचे अस्तित्व होते हे अनेक शिलालेखीय व साहित्यिक पुराव्यावरून सिद्ध करता येते. पण या जातींपैकी कुठल्याच जातीत बौद्ध धर्म अस्तित्वात होता याचा कसलाच पुरावा नाही. वारकरी संप्रदायावर बौद्ध धर्माचा कसलाच प्रभाव नाही, उलट हा संप्रदाय जैन धर्माचे झालेले रुपांतर आहे. वारकरी संप्रदायातील अनेक गोष्टी या जैन धर्माशी मेळ खातात, बौद्ध धर्माशी नाही. कसे ते पहा:

* जैन धर्म आत्म्याचे अस्तित्व मानतो, तसेच वारकरी संप्रदायात देखील आत्म्याचे अस्तित्व मानले गेले आहे. याउलट बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व अजिबातच नाकारतो. आत्म्याचे अस्तित्व न मानणा-या बौद्ध धर्मात वारकरी संप्रदायाचे मूळ असू शकत नाही.

* जैन धर्मात मोक्ष ही संकल्पना आहे, तशीच ती वारकरी संप्रदायातही आहे. बौद्ध धर्मात मोक्षाची वेगळी संकल्पना आहे आणि तिथे तिला निर्वाण म्हंटले जाते. मोक्ष ही संकल्पना वारकरी संप्रदायात जैन धर्मातूनच आली आहे. ती जर बौद्ध धर्मातून आली असती तर तिला निर्वाण असे म्हंटले गेले असते, मोक्ष नव्हे.

* जैन धर्मात मंदिरे आणि मूर्तीपूजा आहे. वारकरी संप्रदाय देखील मूर्ती व मंदिरे यांना मानतो. याउलट भारतातील  बौद्ध धर्मात पूजा हा प्रकार नाही, पण जैन धर्मात प्राचीन काळापासून आहे. किंबहुना पूजा ह्या प्रकाराचे मूळ जैन धर्मातच आहे, कारण वैदिक धर्मात यज्ञ हा प्रकार असायचा, तेथे पूजा नव्हती. अर्थातच वारकरी संप्रदायात पूजा करण्याची प्रथा जैन धर्मातून आली आहे.

* जैन धर्मात शाकाहाराला अतिशय महत्व आहे, तसेच शाकाहाराचे महत्व वारकरी संप्रदायातही आहे. याउलट बौद्ध धर्मात शाकाहाराला महत्व नाही. गौतम बुद्ध यांनी दुस-याने मारलेल्या जनावराचे मांस खायला हरकत नाही असे सांगितले आहे. पण वारकरी तर कट्टर शाकाहारी. याचाच अर्थ असा की वारक-यांचा शाकाहार जैन धर्मातून आला आहे, तेथे बौद्ध धर्माचा कसलाच संबंध नाही.

* जैन धर्मात उपवासाला अतिशय महत्व आहे, तसेच महत्व वारकरी संप्रदायात देखील आहे. याउलट गौतम बुद्ध यांनी उपवासाचा निषेध केला आहे. त्यामुळे उपवास करण्याची प्रथा वारकरी संप्रदायात बौद्ध धर्मातून नव्हे तर जैन धर्मातून आली आहे.

* जैन धर्म व वारकरी संप्रदाय या दोन्हीत चातुर्मासाला महत्व आहे. प्राचीन काळी बौद्ध धर्मात चातुर्मास पाळला जात असला तरी तेथे त्याला जैन धर्माइतके महत्व नव्हते. म्हणजे चातुर्मास मानण्याची प्रथा वारकरी संप्रदायात जैन धर्मातूनच येवू शकते, बौद्ध धर्मातून नव्हे.

* अनेक ओ.बी.सी. व बलुतेदार जातीत परंपरेने जैन धर्माचे पालन करणारे लोक दिसतात. उदाहरणार्थ शिंपी, कासार, कोष्टी, सुतार, गुरव, परीट, न्हावी वगैरे. परंतु अशा एकाही जातीत बौद्ध धर्माचे पारंपारिक अनुयायी दिसत नाहीत. महाराष्ट्रात एकाच जातीत जैन, वारकरी आणि महानुभाव अनुयायी असल्याचे दिसते, पण अशा जातीत बौद्ध धर्माचे अनुयायी का नसतात, याचाही या संदर्भात विचार करायला पाहिजे. 

याशिवाय वारकरी घालत असलेले साधे पांढरे कपडे, पायी यात्रा करणे वगैरे गोष्टी जैन धर्माचे अवशेष (Remains) आहेत.

अगदी अलीकडेपर्यंत या संप्रदायात गंभीर आजारी पडल्यास अन्न-पाणी यांचा त्याग करून मरण पत्करण्याची प्रथा होती. ही प्रथा सरळ सरळ जैन धर्मात असलेल्या सल्लेखना किंवा संथारा या प्रथेचा वारकरी संप्रदायावरील प्रभाव होता. बौद्ध धर्मात अशी प्रथा फारशी नव्हती, जी होती ती फक्त प्राचीन काळातच होती.

वारकरी संप्रदाय महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि तेलंगणा या भागात पसरलेला आहे. या संप्रदायाची सुरवात १३व्या शतकात झाली. याच भागात साधारण याच काळापर्यंत जैन धर्माचे अस्तित्व होते, पण तिथे या काळात बौद्ध धर्म अजिबात अस्तित्वात नव्हता. किंबहुना सातव्या-आठव्या शतकापर्यंत या भागातून बौद्ध धर्म पूर्णपणे संपला होता. याउलट जैन धर्म शिलाहारांच्या राजवटीपर्यंत म्हणजे तेराव्या शतकापर्यंत इथे टिकून होता. आता वारकरी संप्रदायाचा जन्म जेंव्हा झाला तेंव्हा अस्तित्वात नसलेल्या बौद्ध धर्माचा प्रभाव त्या संप्रदायावर कसा काय पडणार?

केवळ तुकाराम महाराज भंडा-याच्या डोंगरावरील बौद्ध गुफेत जायचे यावरून त्यांच्यावर किंवा वारकरी संप्रदायावर बौद्ध धर्माचा प्रभाव होता असे म्हणणे चुकीचे आहे. त्या गुफेत जाण्याचा त्यांचा हेतू चिंतन-मननासाठी एकांत मिळवणे हाच असू शकतो.

एकोणीसाव्या शतकातील एडवर्ड थॉमस हे इतिहास संशोधक आणि रॉयल एशियाटिक सोसायटीचे फेलो होते. आपल्या The Early Faith of Asoka या ग्रंथात त्यांनी अशी तक्रार केली आहे की इतिहास संशोधकांनी जैन धर्माकडे दुर्लक्ष करून बौद्ध आणि ब्राम्हणी धर्माला अवाजवी महत्व दिले आहे. आपल्या या ग्रंथात त्यांनी डॉक्टर स्टीवनसन या संशोधकाची मते देत सांगितले आहे की पंढरपूरच्या विठोबाची मूळ मूर्ती ही जैन तीर्थंकर नेमीनाथ यांची मूर्ती होती. पुढील काळात पंढरपूरचे मंदिर ब्राम्हणांच्या ताब्यात गेले आणि त्यांनी हळूहळू मूळ मूर्तीचे आपल्या स्वार्थासाठी रुपांतर केले.

विठ्ठलाचे मंदिर आज ब्राम्हणांच्या ताब्यात असले तरी या मंदिराची कायदेशीर वहिवाट अगदी अलीकडेपर्यंत विठ्ठलदास या जैन घराण्याकडे होती.

याचा अर्थ असा होतो की विठ्ठल, वारकरी संप्रदाय, जैन धर्म यांचा जवळचा संबंध आहे.

या मंदिराचे रुपांतर कसे कसे होत गेले या विषयावर तात्या केशव चोपडे यांनी पंढरपूरचा विठोबा हे पुस्तक लिहिले होते. हे दुर्मिळ पुस्तक माझ्याकडे असून लवकरच मी ते इंटरनेटवर अपलोड करत आहे.

हेही वाचा:   
संत तुकाराम आणि जैन धर्म
बौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता
भारतीय इतिहासाची जैन साधने: भाग 1: जैन शिलालेख
 बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?

8 comments:

Kalpesh Jadhav said...

1. Vitthal murtikhali je kamal disate,te kuthal pratik aahe?
2. 'pundalik' ha shabd paali bhashet aahe. To kasa?
3. Vishnu dashawatar madhe kahi sahityat 9 vya sthanavar kadhi vishnu la mhatalay,kadhi vitthala la tar kadhi budhha la... He kase?
4. Jya bhagat wari hote tyachya sampurn aaju bajuchya parisarat prachin baudhh lenya aadhalatat... Agadi karnatak prantamadhe sudhha. Te budhhism cha prabhav v astitv nasalyamulech ka?
5. Yuge 28,hi Mahayan samradayatali katha kashamule aali?
6. Dr.Ambedkarani Dharmantarapurvi eka bhashana madhe Vitthal ha budhh asalyacha ullekh kelay...to kuthalya gruhitakavar?(Tyancha abhyas ya vishayavar suruch hota jo durdaivane apurn rahila)
7. Chaturmaasa madhe hi vari chalate. Paurnime ch mahatw baudhh sahityat disun yet.
8. 'Pandurang' ya shabdachi vyutpatti kuthun zali? ...yache pan kahi sandarbh pali bhashet sapadatat te kase?
9. Jain Tirthankaranchya jya murti mazya pahanyat aalyat tya madhe dole ughade aahet... Mag vithhalachech band ka?
----
Mi abhyasak nakkich nahi pan chikitsak ya natyane padalelya prashnanche samadhan vhave hi apeksha.

Vitthal Khot said...

धन्यवाद वारी संबधित लिखाणासाठी -
आमच्या गवळी- धनगर समाजात सर्वात मोठे सन म्हणजे पंढरपूर ची यात्रा आणि गोकुळ अष्टमी. विठ्ठल हि मुळात गवळी-धनगराची कुल देवता आहे.

सागर भंडारे (Sagar Bhandare) said...

महावीरजी,
संजय सोनवणी यांचा "वारीसंगे चालताना…" हा लेख वाचला. एका संशोधक वृत्तीच्या लेखकाने संशोधन करुन लिहिलेला असल्यामुळे त्या लेखातील प्रमाणांची विश्वासार्हता आहेच. पण तुमचा दृष्टीकोन एक नवा आहे हे मान्य करावेच लागेल.
पण त्यासाठी काही पुराव्यांचा दाखला दिलात तर या मताला एक वजन प्राप्त होईल. लेख आवडला आहे हे वेगळे सांगायला नकोच :)
धन्यवाद,
संजय सोनवणी यांच्या "वारीसंगे चालताना…" या लेखाची लिंकः
http://sanjaysonawani.blogspot.in/2012/06/blog-post_5007.html#comment-form

Unknown said...

वारकरी संप्रदाय हा हिंदु समाजातील भाग नाही, हे तरी शेवटी खरे आहे.
भारतामध्ये हिंदु धर्म पसरविण्यासाठि बराच इतिहास, घटना व संस्कृती हिंदु धर्माच्या बाजुने व्यवस्थित जुळवुन आणले आहे...
महत्वाचे म्हणजे जगाच्या पाठीवर लालच, जबरदस्ती व आर्थिक मदती शिवाय फक्त जैन व बौद्ध धर्म प्रसार पावले आहेत.
धर्म प्रसार करण्यासाठी कुराण, बायबल, गीता, महाभारत, इतर धार्मिक ग्रंथासारखे बौद्ध व जैन धर्मास भले मोठे ग्रंथ लिहीण्याची देखील गरज लागलेली नाही, हे ही तितकेच खरे आहे....

dasharath yadav said...

वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे हे सांगताना सांगवीकर जैन धमारर्माचा दाखला देतात...हे जरी खरे असले तरी याचे मूल दडले आहे ते शंभुकाच्या गद्दारीत...चंद्रगुप्त्ला मारुन शंभुकाने वैदिक परंपरा रुड करण्याचा प्रयत्न केला.त्याकाळात...बौद्ध प्रसारक व प्रचारकांची हत्या करण्यात आली...त्यावेळी लुप्त झालेला हा धमर्म....या देशात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून विचार तगवून उभा होता...उघडपणे त्यांना जगता येत नव्हते..शंभुकाच्या दहशतवादातच वारकरी संप्रदायाच्या उदयाची मुळे आहेत...हे पण ल्‍आत घ्यायला हवे..बोद्ध धमर्मच मुळ विचार जागेवर ठेवत वारकरी बनून या देशात वाढत होता...त्यामुळे सांगवीकरांनी जे जैनांची पंरंपरा दिसते. पण बौद्धांची समाजात दिसत नाही. ही जी अओरड केली ती चुकीरची आहे...त्यामुळे महावीर सांगवीकरांचे तकर्कशास्‌ याला लागू पडत नाही....विठ्ठल ही बुद्आची मूतीर् आहे..............बौद्ध धम्रमार्मंआचा समूळ नास करण्यासाठी टपलेल्यांनी बाबासाहेबांनी धमर्मांतर केल्यावरही या धमाला हलके ठरवलेच....पण या दोशात बौद्ध धमार्माच्या सगळ्यात जास्त जुन्या खुणा लेणी व इतिहास विखुरलेला आहे हे सांगायला लागू नये...................dasharath yadav

Mahavir Sanglikar said...

दशरथ जी, मी सांगवीकर नसून सांगलीकर आहे...... हे सांगण्याचे कारण असे की आपण केवळ स्पेलिंग मिस्टेक करत नसून ब-याच चुका करत आहात. हा शम्भूक कोण? बहुधा आपल्याला पुष्य मित्र शुंग म्हणायचे असावे. पुष्यमित्र शुंग याने चंद्रगुप्ताला मारले नसून बृहद्रथ या मौर्य राजाला मारले होते. अनेकांना वाटते की बृहद्रथ हा बौद्ध होता, पण तो बौद्ध नव्हता तर आजीवक या संप्रदायाचा होता. तसेच चंद्रगुप्त हा देखील बौद्ध नव्हता तर जैन होता. पुष्यमित्र शुंग हा इ.स. पूर्व दुस-या शतकात झाला, तर वारकरी संप्रदाय हा १३व्या शतकात उदयास आला. म्हणजे तब्बल १५ शतकांनी. या पंधरा शतकात अनेक संप्रदाय उदयास आले आणि गेले. त्यामुळे बौद्ध आणि वारकरी संप्रदाय यांचा ओढून ताणून संबंध जोडणे एकदम चुकीचे आहे. तसेच मी माझ्या लेखामध्ये उपस्थित केलेल्या मूळ मुद्यांकडे चक्क दुर्लक्ष केले आहे ... ते म्हणजे वारकरी संप्रदाय आत्मा मानतो, तर बौद्ध धर्म तो मानत नाही, आणि वारकरी हे कट्टर शाकाहारी असतात, तर बौद्ध धर्म शाकाहाराचे समर्थन करत नाही. या देशातील आणि या राज्यातीलही सगळ्यात जुने अवशेष हे जैन अवशेष आहेत, बौद्ध अवशेष नव्हेत. कृपया लेखातील मुख्य मुद्यांवर आपले मत व्यक्त करावे.

Drvijay kudtarkar said...

Rushi tyancha aashramat sheti karat hote gayi palat hote te gavali kashe kaya zale ?????

Aarti Bhargude said...

गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू पडते.. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्‍नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे