-महावीर सांगलीकर
मराठी भाषेतील पहिला
शिलालेख कोणता? तर तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील ‘श्री चामुंडराये करवियले’
हाच आहे. तो इ.स. 983 मध्ये कोरण्यात आला हे अनेक पुरावे देवून सिद्ध करता येते.
तरीदेखील कांही विद्वान वरील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख नसून कोकणातील
अक्षी या गावी असलेला शिलालेख हाच मराठीतील पहिला शिलालेख आहे असे मानतात.
श्रवणबेळगोळ येथील मराठी शिलालेखाला पहिला शिलालेख मानण्यास नकार देणा-या विद्वानांची नेमकी
काय अडचण असावी बरे? हे पहाणे मनोरंजक ठरेल.
पहिली गोष्ट म्हणजे
श्रवणबेळगोळ हे ठिकाण महाराष्ट्राच्या सीमेपासून शेकडो किलोमीटर दूर, कर्नाटकाच्या
दक्षिण भागात आहे. हा म्हणजे अगदीच ‘परप्रांत’ झाला. (बेळगाव वगैरे असते तर
एखादेवेळी ठीक असते). तर या परप्रांतात असणा-या शिलालेखाला पहिला मराठी शिलालेख
मानणे त्या विद्वानांना कसे बरे पेलवेल?
दुसरी गोष्ट म्हणजे
श्रवणबेळगोळ हे जैन परंपरेशी संबधीत एक ऐतिहासिक ठिकाण आहे. हे तर आणखीनच अडचणीचे.
जैनांचे श्रेय मान्य करणे म्हणजे त्या विशिष्ट विद्वानांना पापच वाटत असावे, कारण
ते तर ‘न गच्छेत जिन मन्दिरम’ या संस्कारात वाढलेले.
या उलट अक्षी येथील
शिलालेख हा महाराष्ट्रात आहे आणि ब्राम्हणांशी संबधीत आहे. मग ओढून ताणून का होईना
त्या शिलालेखाला मराठीतील पहिला सिद्ध करणे ही या विद्वानांची एक मोठी जबाबदारी
बनते. असो.
पण या विद्वानांच्या
अक्षीच्या शिलालेखाला पहिला ठरवण्याच्या खटाटोपाला खीळ घालण्याचे काम डॉ.
ब्रम्हानंद देशपांडे, डॉ. यु. म. पठाण, डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे, डॉ. सदानंद मोरे
अशा अनेक विद्वानांनी केले आहे. त्यांनी अनेक पुरावे देवून, तर्क देवून ‘श्री
चामुंडराये करवियले’ हा शिलालेखच पहिला मराठी शिलालेख असल्याचे म्हंटले आहे. तरीही
‘अक्षीवादी’ किरकोळ विद्वान अधून मधून डोके वर काढतच असतात. असो.
एक मुद्दा मात्र
सगळ्यांच्याच नजरेतून सुटलेला दिसतो. तो म्हणजे अक्षीचा शिलालेख हा खरेच ‘मराठी’
शिलालेख आहे का? की दोन-चार मराठी शब्द असणारा संस्कृत शिलालेख? हे आता वाचकांनीच
ठरवावे.
अक्षीचा शिलालेख
गीं सुष संतु|
स्वस्ति ओं| पसीमसमुद्राधिपती|
स्री कोंकणा
चक्रीवर्ती| स्री केसीदेवराय|
महाप्रधान भईर्जु
सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने|
सकु सवंतु ९३४
प्रधावी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौलु|
भईजुवे तथा बोडणा
तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु|
महलषुमिची वआण|
लुनया कचली ज-
हा शिलालेख जर मराठी
भाषेत असेल तर मराठी ज्यांची मायबोली त्यांना त्याचा अर्थ कांही प्रमाणात तरी कळायला हरकत नाही. प्रत्यक्षात तो केवळ संस्कृत
भाषिकांनाच कळू शकतो.
हेही वाचा:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा