सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०१४

संस्कृत भाषेबद्दल कोण काय म्हणतात?

-महावीर सांगलीकर


संस्कृत भाषेबद्दल अनेक संत, विद्वान, अभ्यासक, भाषा शास्त्रज्ञ, समाज सुधारक यांनी आपली मते मांडली आहेत. त्यापैकी कांही निवडक मते मी येथे देत आहे.

राजा राम मोहन राय हे बंगालमधील प्रसिद्ध समाज सुधारक होते. ते नुसतेच समाजसुधारक नव्हते, तर त्यांनी धर्म, तत्वज्ञान, विविध भाषा यांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी उपनिषिदांचा बंगाली भाषेत अनुवाद केला होता. (त्याबद्दल वैदिकांनी त्यांना प्रचंड विरोधही केला होता). राजाराम मोहन राय संस्कृत भाषेबद्दल म्हणतात:
संस्कृत भाषा ही इतकी अवघड आहे की ती व्यवस्थित शिकायला तुम्हाला आख्खे आयुष्य वाया घालवावे लागेल, आणि तुम्ही केलेल्या कष्टाचा फारसा कांही उपयोग होणार नाही, कारण संस्कृत साहित्यातून तुमच्या हाती फारसे कांही लागणार नाही.

संत तुलसीदास हे संस्कृतचे विद्वान असूनही त्यांनी हिंदी भाषेत लिखाण केले. त्यांनी संस्कृत भाषेबद्दल म्हंटले आहे:
माझी भाषा (हिंदी) म्हणजे अमृताने भरलेले मातीचे भांडे आहे, तर संस्कृत भाषा म्हणजे विषाने भरलेला रत्नजडीत प्याला आहे.

संस्कृत भाषेबद्दल संत एकनाथांचे मत मराठी भाषेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. संस्कृत भाषा ही देववाणी आहे असा संस्कृतवाद्यांचा दावा आहे. त्यावर संत एकनाथ म्हणतात,
संस्कृत भाषा ही देवांनी तयार केली, तर प्राकृत (मराठी) काय चोरांनी तयार केली?

सुफी परंपरेतील प्रसिद्ध संत कबीर यांनी संकृत भाषेला साचलेले डबके, तर लोकभाषांना वहाते पाणी म्हंटले आहे.

विसाव्या शतकातील एक महान तत्वचिंतक ओशो यांचे संस्कृत भाषेबद्दलचे विचार फार महत्वाचे आहेत. ते म्हणतात:
संस्कृत ही बोली भाषा कधीच नव्हती. सामान्य लोकांना कळू नये म्हणून वैदिकांनी बनवलेली ती एक कृत्रिम भाषा होती.

प्रसिद्ध इतिहास संशोधक व समाजसुधारक भास्करराव जाधव आपल्या मराठे आणि त्यांची भाषा या पुस्तकात म्हणतात:
जे लोक जी भाषा बोलतात, त्या भाषेला त्या लोकांचे नाव देण्यात येते. संस्कृत या नावाचे लोक असल्याचा दाखला नाही. त्या नावाचा देशही नव्हता. 

अॅडव्होकेट प्र.रा. देशमुख हे सिंधू संस्कृतीचे एक जग प्रसिद्ध अभ्यासक होते. त्यांचा Indus Civilization, Rigved and Hindu Culture हा ग्रंथ म्हणजे सिंधू संस्कृतीच्या संशोधनातील मैलाचा दगड मानला जातो. ते संस्कृत भाषेबद्दल म्हणतात:
जनभाषेपासून आपली भाषा कशी वेगळी आहे हे दाखवण्यासाठी वैदिकांनी व्याकरणाचे नियम तयार केले.

ज्ञानकोषकार केतकर त्यांच्या विद्वत्तेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. ते म्हणतात:
प्राकृत साहित्य स्वतंत्रपणे वाढले, संस्कृत साहित्य  मात्र प्राकृत साहित्याचे संहितीकरण करून वाढले. प्राचीन राजे आणि लोक प्राकृतातच बोलत.

असेच मत द डायन्यामिक ब्राह्मिन या पुस्तकाचे लेखक बी.एन. नायर यांनी मांडले आहे. ते म्हणतात:
संस्कृत ही कधीच बोली भाषा नव्हती. ते केवळ प्राकृत भाषेचे संस्कारित रूप होते.



प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक संजय सोनवणी म्हणतात:
मुळात संस्कृत भाषा ही ग्रंथनिर्मितीसाठी प्राकृत भाषांवर संस्कार करून बनवली गेली, म्हणून तिला संस्कृत म्हणतात. ती मूळ भाषा नाही. ... प्राकृत भाषांत जेवढे साहित्य लिहिले गेले, त्याच्या 1/10 साहित्यही संस्कृतमध्ये नाही. संस्कृत ही कधीच कोणत्याही मानवी समुदायाची भाषा नव्हती, त्यामुळे आजही ती ग्रंथातील भाषा आहे.

तमिळनाडूमधले एक इतिहास संशोधक थंजाई नलनकिल्ली म्हणतात:
संस्कृत ही कधीच जिवंत भाषा नव्हती. ती कधीच घरामध्ये किंवा व्यवहारात बोलली गेली नाही. गेली हजारो वर्षे ब्राम्हण हे घरात आणि व्यवहारात स्थानिकांची भाषा वापरतात.

संस्कृत  भाषेत खूप ज्ञान आहे हे ऐकून कॅरे या ख्रिस्ती मिशन-याने त्या भाषेचा सखोल अभ्यास केला. तो म्हणतो:
संस्कृत भाषेच्या खजिन्यात दगड आणि धोंडे याशिवाय कांहीही नाही.

इतिहास संशोधक पु.श्री.सदार म्हणतात: वैदिक संस्कृत मधून देशी भाषा उत्पन्न होऊच शकत नाहीत.

इतिहास संशोधक प्रा. मा.म. देशमुख म्हणतात:
संस्कृत ही देवभाषा होय असे मानणे म्हणजे सूर्य पृथ्वी भोवती फिरतो असे मानण्यासारखे अडाणीपणाचे आहे..... संस्कृतला देव भाषा मानणे म्हणजे मानवाच्या निर्मितीपूर्वीच ती अस्तित्वात होती अशी बनवाबनवी करणे होय. ... संस्कृत भाषेत मुळातच शब्दसंग्रह अत्यल्प होता, (नव्हताच), म्हणून संस्कृतने अनेक भाषांतील शब्द स्वीकारलेत आणि आता ज्या ज्या भाषांतील शब्द संस्कृतमध्ये आहेत, त्या-त्या सर्व भाषांची जननी संस्कृत होय असे सांगण्याचा कृतघ्नपणा संस्कृत पंडितांनी केला आहे. 

प्राध्यापक शाम सुंदर दास आपल्या हिंदी भाषा का विकास या पुस्तकात म्हणतात:
मूळनिवासी लोकांची भाषा आपल्या भाषेत शिरते हे पाहून आर्यांनी आपल्या भाषेला संस्कारित करून वेगळे केले. परंतू पूर्वी शिरलेले शब्द आर्यांच्या भाषेत तसेच राहिले.

(माझ्या संस्कृत भाषेचे गौडबंगाल या पुस्तकातले एक प्रकरण)

हेही वाचा:


1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

Thnx for information
Sanskrit is a language which created by sanatani vaidik to ullo banaving india's native people.

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे