सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

Tuesday, December 26, 2017

जैन साहित्यात मातंग: यमपाल चांडाळाची गोष्ट

-महावीर सांगलीकर 

प्राचीन काळी एकदा काशीच्या राजाने आदेश दिला की पर्युषण पर्वाच्या काळात राज्यात जीवहत्या होऊ नये. जो जीवहिंसा करेल त्याला सुळावर चढवले जाईल.

अशी राजाज्ञा असूनही एका सेठपुत्राने जीवहत्या केली. राजाला जेंव्हा हे कळाले तेंव्हा त्याने सेठपुत्राला सुळावर चढवण्याचा आदेश दिला. त्यावेळी गुन्हेगाराला सुळावर चढवण्याचे काम यमपाल नावाचा चांडाळ करत असे. कोतवालाने सेठपुत्राला सुळावर चढवण्यासाठी यमपालाला बोलवण्यासाठी शिपाई पाठवले. आपल्याकडे शिपाई येत असल्याचे बघून यमपालाला अंदाज आला कि हे कुणालातरी सुळावर चढवण्यासाठी आपल्याला बोलवायला आले आहेत. तो घरात लपून बसला आणि बायकोला सांगितले, ‘त्यांना सांग कि मी गावाला गेलो आहे’. पण कुणाला तरी सुळावर चढवले की यमपालाला बक्षीस मिळत असे, त्या लोभाने त्याच्या बायकोने तो घरात आहे असे शिपायांना सांगितले. मग शिपाई त्याला जबरदस्तीने राजाकडे घेऊन गेले.

यमपालाने राजाला ‘मी या पर्वकाळात कुणालाही सुळावर चढवणार नाही’ असे सांगितले. राजाला याचा राग येऊन त्याने यमपाल आणि सेठपुत्र या दोघांनाही मगरी असणाऱ्या तलावात फेकून देण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे शिपायांनी त्या दोघांना त्या तलावात मगरींपुढे फेकून दिले.

पण काय आश्चर्य! त्या मगरींनी सेठपुत्राला खाऊन टाकले, पण यमपालाला मात्र सोडून दिले. राजाला हे कळल्यावर त्याला आपली चूक उमगली आणि त्याने यमपालाचा मोठा सन्मान केला.

( या कथेतून घेण्याचा बोध हा आहे कि आपण घेतलेले व्रत संकट आले तरी सोडू नये).


हेही वाचा:
No comments:

माझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..

शोध आणि बोध LATEST

कृपया हे पेज लाईक करावे