सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

शुक्रवार, २२ जुलै, २०१६

चाणक्याविषयी नवीन कांही . . जैन साहित्यात चाणक्याचा शोध

पुस्तक परीक्षण: चाणक्याविषयी नवीन कांही . . जैन साहित्यात चाणक्याचा शोध
महावीर सांगलीकर 
9145318228






डॉक्टर नलिनी जोशी या प्राकृत भाषातज्ञ, जैन धर्म आणि जैन तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक, संशोधक आहेत.  त्या पुणे विद्यापीठाच्या जैन अध्यासनाच्या प्रमुख होत्या. भांडारकर संशोधन संस्थेच्या प्राकृत-इंग्रजी डिक्शनरी प्रोजेक्टमध्ये त्यांचे महत्वाचे योगदान आहे. गेली अनेक वर्षे त्या सन्मती तीर्थ या पुण्यातील संशोधन संस्थेच्या माध्यमातून जैन विद्या आणि प्राकृत भाषेचा प्रचार करत आहेत. त्यांची संबधित विषयांवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

चाणक्याविषयी नवीन कांही .. जैन साहित्यात चाणक्याचा शोध  हे त्यांचे नवीन पुस्तक.

चाणक्य हे व्यक्तिमत्व भारतीय समाज मनाला भुरळ घालणारे आहे. चाणक्याविषयी आजपर्यंत विविध भाषांमध्ये बरेच कांही लिहिले गेले आहे. चाणक्य ही मुख्य व्यक्तिरेखा असणारी अनेक नाटके, कथा कादंबऱ्या, टी.व्ही. मालिका आहेत. पण या सगळ्यातला चाणक्य मुख्य आठव्या शतकात लिहिले गेलेल्या मुद्राराक्षस या प्रसिद्ध नाटकावर बेतलेला आहे. कांही ठिकाणी वैदिक परंपरेतील इतर साहित्याचा थोडासा आधार घेतलेला दिसतो. पण जैन साहित्यातील चाणक्याच्या कथांचा आधार घेण्याचे अगदी अभ्यासकांच्या कडूनही टाळले गेले आहे.

प्राचिन जैन साहित्यात चाणक्याच्या अनेक कथा, प्रसंग आणि उल्लेख मिळतात. डॉक्टर नलिनी जोशी यांनी आपल्या चाणक्याविषयी नवीन कांही या पुस्तकात जैन साहित्यातील चाणक्यावर प्रकाश टाकला आहे आणि त्याच्या विविध पैलूंविषयी विस्ताराने लिहिले आहे. 314 पानी या पुस्तकासाठी त्यांनी श्वेतांबर आणि दिगंबर परंपरेतल्या अनेक प्राचिन ग्रंथांचा आधार घेतला आहे.

या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर जोशी यांनी जैन साहित्यातील चाणक्याविषयी तर विस्ताराने लिहिलेच आहे, शिवाय वैदिक परंपरेच्या साहित्यातील चाणक्याशी तुलनात्मकही लिहिले आहे. या पुस्तकात संशोधनात्मक लिखाणाबरोबरच जैन संदर्भांच्या आधारे चाणक्याची समग्र जीवन कथाही दिली आहे.

जैन साहित्यातील चाणक्याकडे अभ्यासाकांचे दुर्लक्ष झाल्यामुळे चाणक्याच्या आयुष्यातील अनेक प्रसंग गुलदस्त्यातच राहिले आहेत. हे पुस्तक ही त्रुटी दूर करणारे आहे. त्यामुळे डॉक्टर जोशी यांचे हे पुस्तक अभ्यासकांना अतिशय उपयोगी आहे. शिवाय या पुस्तकात जैन साहित्याच्या आधारे लिहिलेली चाणक्याची समग्र जीवन कथा सामान्य वाचकांना मोहित करेल.

चाणक्याविषयी नवीन कांही . .
लेखिका: डॉक्टर नलिनी जोशी
प्रकाशक: सन्मती तीर्थ, पुणे
पाने: 314
किंमत: 400 रुपये

(हे पुस्तक ईबुकच्या रुपात मोफत मिळवण्यासाठी veerampbl@gmail.com या ईमेलवर लिहावे. ईमेल मध्ये पुस्तकाचे नाव लिहावे).

 

हेही वाचा: 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे