सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

सोमवार, २ मे, २०२२

महाराष्ट्र आणि जैन धर्म

वर्धमान श्रीपाल दिगंबरे. वळीवडे. 

8805783121

"मंगल देशा, पवित्र देशा महाराष्ट्र देशा.

  प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा."                   

हे गीत ऐकताच प्रत्येक महाराष्ट्रवासियांचा उर भरून येतो.आणि तो येणारच कारण या मातीचा आम्हास सार्थ अभिमान आहे.             

या महाराष्ट्राच्या मातीत अनेक धर्म, जात,पंथ  गुणागोविंदने नांदत आहेत.या राज्यासारख क्वचितच राज्य असेल जे इतके धार्मिक बाबतीत सहिष्णू असेल.आणि याला महाराष्ट्राचा सामाजिक आणि धार्मिक इतिहास कारणीभूत आहे.

इतिहासात पहिलं तर जैन धर्म,बौद्ध धर्म,हिंदू धर्म आणि विविध भक्ती चळवळींच्या मत मंथनातून हा महाराष्ट्र घडलेला आहे.

महाराष्ट्रात खूप प्राचीन काळापासून जैन धर्माचे अस्तित्व आहे.आणि जैन मतांचा येथील प्रजेवर प्रभाव आहे. १४ व्या शतकात दिसणाऱ्या भक्ती चळवळी मागे कुठेना कुठे जैन मतांचे अस्तित्व दिसते.मुळातच महाराष्ट्राचे प्राचीनत्व जर शोधण्याचा प्रयत्न केला गेला तर जैन साहित्य,शिलालेख यांचा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरतो.

इ.स.७७८ "कुवलयमाला" या उद्योतनसुरी कृत जैन ग्रंथात  दढमडल सामलंगे सहिरे अहिमान कलहसिले य | दिन्नले गहील्ले उल्लविरे तत्थ मरहठ्ठे ||  म्हणजे बळकट,ठेंगण्या,सावळ्या अंगाच्या,काटक अभिमानी, भांडखोर,दिन्नले(दिले),गहील्ले(घेतले) असं बोलणाऱ्या मराठ्यांच्या पहिले,अस एका मराठी वाण्याच व त्याच्या भाषेचं वर्णन उद्योतनसुरी या जैन मुनींनी केलं आहे.

महाराष्ट्राचा सर्वात जुना उल्लेख असलेला शिलालेख पहायचं म्हटलं तर कर्नाटकातील ऐहोळ  येथील "जिनेंद्रभवन" नावाच्या प्राचीन जैन मंदिरावरील प्रसिद्ध जैन कवी रविकिर्ती यांची ऐहोळ प्रशस्ती अभ्यासाला लागेल ज्यात  नव्यानव हजार गव्यतूक्षेत्र असलेल्या तीन महाराष्ट्र प्रदेशाचा चालुक्य नृपती पुलकेशी(दुसरा) हा राजा झाला असा उल्लेख येतो.इ.स.६३४ सालच्या या जैन शिलालेखात सर्वात प्रथम महाराष्ट्राचा उल्लेख येतो.

इतिहासातील अनेक जैन राजघराणी ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं.त्यापैकी बरेच जैन राजघराणी महाराष्ट्रीयन होती जसे की कोल्हापूरचे शिलाहार राजे मूळचे उस्मानाबाद येथील तेरचे होते. तसेच गुजरात, मावळ, महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्र,तमिळ या मोठ्या प्रदेशावर राज्य करणारे राष्ट्रकूट घराणे सुद्धा मूळचे महाराष्ट्रीयन आहे त्यांचे मूळ लातूरचे. याच प्रमाणे यादव, कलचुरी आणि अनेक जैन राजघराणे महाराष्ट्रीयन आहेत.मराठा साम्राज्याची तर ही मातृभूमी ज्याच्या मातीतील वीरांनी अटकेपार झेंडे रोवले.

याच बरोबर अनेक जैन मराठी बांधवांनी महाराष्ट्राचे नाव अजरामर केलं आहे. जसे  व्ही.शांताराम, हिराचंद वालचंद, कर्मवीर भाऊराव पाटील, दिवाण बहादुर आण्णासाहेब लठ्ठे, राजू शेट्टी, वैभव मांगले.. आणखी खूप सारे  जैन व्यक्ती ज्यांनी महाराष्ट्राची आणि भारत देशाची सेवा केली आहे. अश्या या रत्नांना घडवणाऱ्या या मराठी मातीला आणि छ.शिवरायांच्या या महाराष्ट्र देशाला मानाचा मुजरा.

हेही वाचा: 


         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे